मत्स्याकार नगी स्वये त्रयरूपे वास्तव्य ज्यांचे असे।
श्री काली, श्री लक्ष्मी, महासरस्वती अन्यत्र ऐसे नसे ।।
नावाची उत्पत्ती: जालना जिल्ह्यातील अंबड शहराच्या दक्षिणेला एक अद्वितीय डोंगर आहे, ज्याचा आकार अगदी माशासारखा (मत्स्याकृती) दिसतो. या डोंगराच्या उदरभागात असलेल्या नैसर्गिक गुहेमध्ये देवी प्रकट झाल्याची श्रद्धा आहे. माशाच्या उदरात वास करणारी देवी म्हणून तिला ‘मत्स्योदरी’ हे नाव प्राप्त झाले.
मंदिराची वैशिष्ट्ये: मंदिराच्या गाभाऱ्यात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही देवींची त्रिस्वरूपी शेंदरी मूर्ती विराजमान आहे.
मत्स्योदरी अंबिका देवीचे मंदिर हे मराठा स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट उदाहरण असून, होळकरकालीन वैभवाचे प्रतीक मानले जाते. सन १७६७ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी डोंगरावरील काळ्या पाषाणाचा उपयोग करून भव्य व सुबक मंदिर उभारले. येथे भव्य ६५ दगडी पायऱ्या व प्रवेशद्वार उभारले असल्याचा उल्लेख आढळतो.
मंदिराचा सभामंडप सुमारे ३० फूट लांब व २० फूट रुंद असून, त्याचे दगडी छत कोणत्याही खांबाशिवाय उभे आहे, ही त्याची विशेष वास्तुशिल्पीय वैशिष्ट्य आहे.
भगवान विष्णूंचे परमभक्त राजा अंबरीष यांनी मार्कंडेय ऋषींच्या मार्गदर्शनाखाली येथे देवीची आराधना केली.
खोट्या आरोपांमुळे संकटात सापडलेले तान्हाजी देशमुख, ज्यांच्या निष्पापतेची साक्ष देवीने आपल्या दिव्य प्रकाशात सामावून घेत दिली.
पांडवांच्या वनवास काळात भीमाने आपल्या गदेने प्रहार करून येथे ‘भीमतीर्थ’ कुंड निर्माण केल्याची कथा प्रचलित आहे.
नृसिंहाचा अनन्य भक्त ज्याला देवीने प्रथम नृसिंह रूपात आणि नंतर मूळ जगन्माता रूपात दर्शन दिले.
अंबड शहरातील सर्व समाज घटकांना उत्सवात सहभागी करून घेण्यासाठी पूर्वीपासून 'बारा बलुतेदार' पद्धतीनुसार मानकरी परंपरा चालत आली आहे. हे मानकरी नवरात्रात देवीच्या विधींसाठी आवश्यक सामग्री श्रद्धेने पुरवतात.
होम हवनाच्या वेळेस सोन्याचे मंगळसूत्र व चांदीचे जोडवे देतात.
होम हवनास लागणारी मातीची भांडी, खेळणी व बोळकी देतात.
होमहवनासाठी बागडी, बुगडी आणि हिरवा चुडा पुरवितात.
होमहवनाच्या आहुती देण्यासाठी लाकडाची धडवंची व पन्हाळ देतात.
नवरात्र काळात देवीला पान-फूल व फुलांच्या माळा देतात.
मत्स्योदरी मातेचे वस्त्र व सामग्री पुरवितात.
नवरात्र काळात फुलाची माळ आणि विड्याचे पान देण्याचा मान आहे.
धार्मिक विधी आणि होमहवनासाठी परडी पुरवितात.
मत्स्योदरी देवीचे स्थान अत्यंत प्राचीन, पवित्र आणि श्रद्धास्थान आहे. याशिवाय परिसरातील इतर स्थळे:
देवीच्या अभिषेक / पूजेसाठी कृपया देवस्थान कार्यालयाशी संपर्क साधावा. आपल्याला उपलब्ध तिथी, वेळ तसेच प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष अभिषेक व पूजेबाबत पाळावयाचे नियम आणि सेवा शुल्क यांची सविस्तर माहिती देण्यात येईल.
श्री मत्स्योदरी देवी संस्थान, मंदिर परिसर आणि ऐतिहासिक वास्तूंची एक झलक.
अध्यक्ष तथा तहसीलदार
सचिव तथा नायब तहसीलदार
विश्वस्त पुजारी
व्यवस्थापक
पत्ता: अंबड, जिल्हा: जालना, महाराष्ट्र 431204
श्री. कैलास रखमाजी शिंदे (व्यवस्थापक): 9284782396
श्री. गोविंद रमणलाल कायस्थ: 9657749475
श्री. गीताविलास सखाराम पंत कुंठेफळकर (पुजारी): 9421662364
कु. सानिका कैलास शिंदे: 7875799250
ई-मेल आयडी: kailasshinde3632@gmail.com